सिव्हील इंजिनिअरींग

Building the Foundation of Tomorrow

सर्व अभियांत्रिकी शाखांची आई... स्थापत्याशिवाय काहीच नाही... सगळ्या जगाचा पाया रचनार एकच सत्य... भक्कम केलयं सगळ्या जगाचं अस्तित्व... सगळी सुरुवात इथुनच आणि शेवट पण इथच... स्थापत्य... फक्त आणि फक्त अभियांत्रिकी स्थापत्य.. स्थापत्य अभियांत्रिकी ही सामान्य मनुष्यावर अत्यंत प्रभावी असणारी अभियांत्रिकी मधील पायामुक्त शाखा आहे. सामान्य जनतेचा शास्त्रोक्त उध्दार आणि शास्त्रीय ज्ञान यांचे उपाययोजन करून समाजाचे कल्याण यावर मार्गदर्शन करण्यासाठी जास्त भर देते. कोणत्याही शास्त्रोक्त कार्यावर अभियांत्रिकीचा असलेला प्रभाव विसरणे अश्यक्य आहे. स्थापत्य अभियंत्यांना सरकारी, व्यक्तीगत, सार्वजनिक, आद्योगिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात व्यवसायाची संधी उपलब्ध आहेत. पदवी किंवा पदविका संपादन केलेले स्थापत्य अभियंते व्यक्तिगत सल्लागार म्हणून कार्य करु शकतात.

डिप्लोमानंतरच्या भविष्यातील संधी

सार्वजनिक क्षेत्र
  • १) संरखना अभियंता (Structural Engg.)
  • २) योजना किंवा आराखडा अभियंता (Design Engg)
  • ३) बांधणी अभियंता (Building Service Engg)
  • ४) कंत्राट अभियंता (Contract Engg.)
  • ५) जलसिंचन अभियंता (Irrigation Engg.)
सरकारी क्षेत्र
  • १) सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
  • २) जलसिंचन विभाग (Irrigation Dept.)
  • ३) नगर रचना विभाग (Town Planning)
  • ४) संरक्षण विभाग (Defence)
  • ५) अणु संशोधन केंद्र (Atomic Research Centre)
  • ६) संरक्षण संशोधन आणि विकास केंद्र (DRDO)
  • ७) लष्करी क्षेत्र (Military Sector)
निम सरकारी क्षेत्र
  • १) प्रदुषण संयमन केंद्र (Pollution Control Board)
  • २) महाराष्ट्र विद्युत परिषण केंद्र (MSEB)
  • ३) नगर परिषद/पालिका (Muncipal Corporation)
  • ४) दुरसंचार केंद्र (Telecom)
  • ५) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA)
  • ६) शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO)
व्यवसाय
  • १) बांधकाम व्यवसायिक (Builders & Contractors)