Excellence in Electronics & Communication Technology
सध्याच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ही शाखा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मुख्यतः संचार तंत्रज्ञानासोबत मूलभूत इलेक्ट्रॉनिक घटक, सर्किट्स आणि सिस्टीम डिझाइनचा वापर केला जातो.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही शाखा संशोधन, मोबाईल कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन, रोबोटिक्स, डिफेन्स, रेडिओ कम्युनिकेशन, टीव्ही प्रसारण, टेलिग्राफी, टेलिफोन, VLSI डिझाईन, DSP, परमाणु विज्ञान, वायरलेस कम्युनिकेशन आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रांत भरपूर संधी उपलब्ध करून देते.
आपल्या खिशातील एफएम रेडिओ, टेलिव्हिजन, संगणक, मोबाईल फोन, तसेच अंतराळातील उपग्रहांपासून प्रत्येक तंत्रज्ञान या शाखेच्या प्रगतीचे प्रतीक आहे.